
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. भारताकडून नदीच्या पाण्याचा प्रवाह रोखण्याची घोषणा करण्यात आली. आता पाकिस्तानी माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले. यामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने मुझफ्फराबादमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार पाकिस्तानी अधिकाऱ्यांना माहिती न देता अचानक झेलम नदीत पाणी सोडले.