
पाकिस्तानला बरोबर घेऊन रशियावर अमेरिकेचा निशाणा, 'ही' आहे रणनीती
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारी आणि अमेरिकन समकक्ष अँटनी ब्लिंकन यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये पुन्हा तरतरी आली आहे. रशियासाठी (Russia) हा एक झटका आहे. इम्रान खानच्या शासन काळात हे दोन देश जवळ येताना दिसत होते. ब्लिंकन यांनी पाकिस्तानला १८ मे रोजी न्यूयाॅर्क येथे होणाऱ्या जागतिक अन्न सुरक्षावर मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. दोन्ही नेते संपर्कात राहणे आणि परस्पर हिताचे प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर भागीदारी वाढवण्यावरही सहमती झाली. पाकिस्तानमध्ये (Pakistan) गेल्या महिन्यात नवीन सरकार बनल्यानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांदरम्यान ही पहिलीच चर्चा झाली आहे. (Pakistan Foreign Minister Bilawal Zardari Talks With His American Counter Part Antony Blinken)
दुसरीकडे रशियाबरोबर भारत (India) आपले संबंध संतुलित ठेवत आहे. या व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी एप्रिल २०२१ मध्ये इस्लामाबादचा दौरा केला आणि दहशतवादाशी लढण्याच्या नावावर पाकिस्तानला एमआय-३५ एम आणि एमआय-१७ हेलिकाॅप्टर आदी अधिक विशेष लष्करी उपकरणे पुरवण्याचा शब्द दिला. याबरोबरच रशियाने २०१६ पासून द्विपक्षीय विशेष दलांबरोबर अरबी समुद्रात सागरी अभ्यास केला. याला अरबी मान्सून म्हटले गेले आहे.
इम्रान यांनी बायडेन सरकारवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
पाकिस्तान आणि रशिया संबंध दृढ करु इच्छित आहे. २४ फेब्रूवारी २०२२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांना भेटण्यासाठी माॅस्कोला गेले होते. यावरुन दोन्ही देशांचे संबंध दृढ करणे हे होते. याच वेळी मास्कोने युक्रेनवर आक्रमण केले होते. १५ ऑगस्ट २०२१ रोजी काबूलवर तालिबानने नियंत्रण मिळविल्यावर प्रशंसा करणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने लोकशाही संमेलनापासून बाहेर ठेवले. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर इस्लामाबादला सहभागी न केल्याबद्दल इम्रान खान यांनी बायडेन प्रशासनावर टीका केली.
पाकिस्तान-अमेरिकेत दीर्घ काळापासून व्यापक संबंध
ब्लिंकन यांच्याशी चर्चा केल्यानंतर बिलावल म्हणाले, की पाकिस्तान-अमेरिका संबंधांवर वेगवेगळ्या दृष्टीने विचार करण्यात आला. पाकिस्तान आणि अमेरिकेदरम्यान दीर्घ काळापासून व्यापक संबंध राहिले आहे. दोन्ही देशांमध्ये परस्पर सन्मान आणि हितांवर आधारित आहे. शांती, विकास आणि सुरक्षा वाढवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. पाकिस्तानची दूरदृष्टी मानवी विकास, प्रादेशिक संपर्क आणि शेजारी देशांबरोबर शांततापूर्ण संबंध ठेवण्यावर आहे.