पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये होणार पहिलं हिंदू मंदिर; उच्च न्यायालयाची परवानगी I Hindu Temple | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu Temple

इस्लामाबादमध्ये 0.5 एकर जमीन 2016 मध्ये हिंदू समुदायाला देण्यात आली होती.

पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये होणार पहिलं हिंदू मंदिर

इस्लामाबाद : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये हिंदू समाजाला दिलेली जमीन रद्द करण्यात आल्यानं वाद झाला होता. या जमिनीवर हिंदू मंदिर, स्मशानभूमी आणि समुदाय केंद्र बांधले जाणार होते. मात्र, या मुद्द्यावर झालेल्या टीकेनंतर ही जमीन हिंदू समाजाला देण्यात आलीय.

डॉन वृत्तपत्राच्या माहितीनुसार, इस्लामाबाद उच्च न्यायालयात (Islamabad High Court) एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान राजधानी विकास प्राधिकरणनं (सीडीए) सोमवारी न्यायालयासमोर खुलासा केला. यात त्यांनी म्हंटलंय की, हिंदू समुदायाला दिलेली जमीन रद्द करण्यात आलीय. सीडीएचे वकील जावेद इक्बाल यांनी न्यायालयाला सांगितलं, की नागरी संस्थेनं या वर्षी फेब्रुवारीमध्ये हिंदू समुदायाची जमीन रद्द केली, कारण त्यावर बांधकाम सुरू झाले नव्हते, असं त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा: धक्कादायक! शौचालयातील पाण्याचा 30 वर्षांपासून पिण्यासाठी वापर

इस्लामाबादमध्ये 0.5 एकर जमीन 2016 मध्ये हिंदू समुदायाला देण्यात आली होती. या जमिनीवर हिंदू मंदिर, स्मशानभूमी आणि समुदाय केंद्र बांधले जाणार होते. जमीन वाटप रद्द झाल्याच्या बातमीनं पाकिस्तानी सोशल मीडियावर हिंदू समाजातून संतापाची लाट उसळली होती आणि अनेकांनी सीडीएच्या या निर्णयावर टीकाही केली होती. सीडीएनं ही अधिसूचना मागे घ्यावी, असंही सांगण्यात आलं होतं.

हेही वाचा: तालिबानच्या 44 सदस्यांची राज्यपालासह पोलिस प्रमुख पदांवर नियुक्ती

गैरसमजातून हिंदू समाजाच्या जमिनी झाल्या रद्द

या संदर्भात बोलताना सीडीएचे प्रवक्ते सय्यद आसिफ रझा म्हणाले, सरकारच्या निर्णयानंतर विविध कार्यालये, विद्यापीठे आणि इतर संस्थांना देण्यात आलेल्या जमिनींचे सर्व वाटप रद्द करण्यात आले असून त्यावर कोणतेही बांधकाम सुरू करण्यात आले नव्हते. मात्र, नागरी संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा गैरसमज करून घेतला आणि त्यामुळं हिंदू समाजाला दिलेली जमीनही रद्द करण्यात आली. मंदिरासाठी दिलेल्या जमिनीवर सीमाभिंत बांधण्यास यापूर्वीच मंजुरी मिळालीय. अशा स्थितीत ही जागा बांधकाम न झालेल्या जमिनीच्या वर्गवारीत येत नाही. त्यामुळं मंत्रिमंडळाचा निर्णय या जमिनीला लागू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या वर्षी जुलैमध्ये पाकिस्तानमधील कट्टरपंथी गटांनी इस्लामाबादमध्ये सरकारी निधीतून हिंदू मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेवर टीका केली होती आणि त्यामुळं सीडीएनं त्या ठिकाणी बांधकाम थांबवले होते.

हेही वाचा: त्रिपुरात भाजपचा झेंडा; निवडणुकीत 334 पैकी 112 जागांवर विजय

Web Title: Pakistan Government Is Constructing First Hindu Temple In Islamabad After Many Controversies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PakistanSupreme Court