पाकिस्तानवर काय वेळ आली? PM इम्रान खान यांचे निवासस्थान देणार भाड्यावर

आज मंगळवारी पाकिस्ताचे मंत्रिमंडळ या बद्दल अंतिम निर्णय घेईल. आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला पैशांची गरज आहे.
imran khan
imran khan Team esakal

इस्लामाबाद: इस्लामाबादच्या रेड झोनमध्ये असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (pakistan pm imran khan) यांचे अधिकृत निवासस्थान भाड्यावर देण्यात येणार आहे. आज मंगळवारी पाकिस्ताचे मंत्रिमंडळ (pakistan cabinet) या बद्दल अंतिम निर्णय घेईल. आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला पैशांची गरज आहे. त्यासाठीच पंतप्रधानांचे निवासस्थान भाडेतत्त्वावर देण्याची वेळ आली आहे.

भाडेतत्वावर दिल्यानंतर सांस्कृतिक, फॅशन, शैक्षणिक आणि अन्य कार्यक्रमांसाठी या निवासस्थानाचा वापर करण्यात येईल. पंतप्रधान निवासस्थानाचा कार्यक्रमासाठी वापर करताना, सभ्यता आणि शिस्तीचे कुठेही उल्लंघन होऊ नये, हे सुनिश्चित करण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी माध्यमांनी हे वृत्त दिलेय.

imran khan
उद्धवजी, हे करून दाखवाच!

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाची सत्ता आहे. २०१९ मध्येच त्यांच्या पक्षाने पंतप्रधान निवासस्थान शैक्षणिक संस्थेमध्ये बदलण्याचा विचार मांडला होता. राज्यपालांच्या राजभवनात राहण्याचा खर्च प्रचंड असतो. त्यामुळे इम्रान खान सरकारने राज्यपालांनी राजभवनात राहू नये, असे जाहीर केले आहे. यातून जो पैसा वाचेल, तो कल्याणकारी योजनांसाठी वापरण्याची पाकिस्तान सरकारची योजना आहे.

imran khan
अफगाणिस्तानात 24 तासांत 40 मृत्यू; भारताला मदतीची हाक

इम्रान खान यांनी इस्लामाबादमधील आपले घर सोडले असून ते बानी गाला भागामध्ये राहत आहेत. २०१९ साली ब्रिगेडीयर वसीम इफ्तीखार चीमा यांच्या मुलीच्या लग्नासाठी पंतप्रधान निवासस्थान भाड्यावर देण्यात आले होते. स्वत: इम्रान खान या लग्नाला उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com