मलेशियाला आता पाकिस्तानची मदत

Palm-oil
Palm-oil

क्वालालंपूर - मलेशियातून आयात होणाऱ्या पाम तेलावर भारताने आयात कर वाढवून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता पाकिस्तान मलेशियाच्या मदतीला धावून आला आहे. 

मलेशियातून येणाऱ्या पाम तेलाची आयात पाकिस्तान वाढविणार असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. ते मलेशियाचा दौऱ्या करणार आहेत. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे. मागील वर्षी पाकिस्तानने मलेशियाकडून ११ लाख टन पाम तेलाची आयात केली होती.  

काय आहे प्रकरण?
भारताने जम्मू आणि काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर मुस्लिमबहुल देश असणाऱ्या मलेशिया आणि तुर्कीने भारतावर टीका केली होती. जम्मू-काश्‍मीरवर हिंदू बहुसंख्य भारत आक्रमण करत असल्याचे मलेशियन पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी म्हटले होते. त्याशिवाय वादग्रस्त इस्लामिक उपदेशक झाकीर नाईक याला दिलेला कायमस्वरुपी रहिवासी दर्जा मागे घेण्यास नकार दिल्यानंतर भारत आणि मलेशियातील आर्थिक संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. त्यात भरीस भर म्हणून महाथिर यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीर 
टीकाटिप्पणी केली. 

यानंतर भारताने आक्रमक धोरण स्वीकारत मलेशियन अर्थव्यवस्थेला देण्यासाठी देण्यासाठी पाम तेलावर मार्च २०२० पर्यंत ५ टक्‍क्‍यांनी आयात कर वाढवून आर्थिक नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला. तसेच मलेशियातून येणाऱ्या पेट्रोलियम क्रूड, रिफाईंड पाम तेल, क्रूड पाम तेल, तांबे आणि ॲल्युमिनियम वायर, मायक्रोप्रोसेसर आणि संगणक व दूरसंचार उत्पादने, एलएनजी इत्यादींचा समावेश प्रतिबंधीत वस्तूंच्या यादीत टाकण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे मलेशियाला मोठा चाप बसला आहे.

नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
जगातील सर्वात मोठ्या पाम तेलाचा उत्पादक देश असलेल्या मलेशियाला भारत हा सर्वात मोठा पाम तेलाचा आयातदार देश असल्याचा विसर पडला होता. मात्र आपली चूक उमगल्यानंतर भारत एक मोठी अर्थव्यवस्था असलेला देश असून भारतासमोर मलेशिया कुठेही टिकणार नाही. त्यामुळे आपण प्रत्युतरादाखल कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. असे विधान करून त्यांनी आपली हतबलता दर्शविली. भारत सरकारची नाराजी दूर करण्यासाठी मलेशियन सरकारच्या मालकीच्या कंपनीने भारतातून होणाऱ्या साखर आयातीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

या वादात आता पाकिस्तानने अप्रत्यक्षरीत्या उडी घेत पाम तेलाची आयात वाढविण्यावर भर देणार असल्याचे सांगत एकप्रकारे भारताच्या विरुद्ध मलेशियाची पाठराखण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com