esakal | पाककडून ‘हिंसाचाराच्या संस्कृती’ला खतपाणी; आमसभेत भारताची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

पाककडून ‘हिंसाचाराच्या संस्कृती’ला खतपाणी; आमसभेत भारताची टीका

पाककडून ‘हिंसाचाराच्या संस्कृती’ला खतपाणी; आमसभेत भारताची टीका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : पाकिस्तानने (pakistan) त्यांच्या भूमीत आणि इतर देशांमध्येही ‘हिंसाचाराच्या संस्कृती’ला कायमच खतपाणी घातले असून त्यांचे हे धोरण अद्यापही कायम आहे, अशी टीका भारताने (india) आज संयुक्त राष्ट्रांमध्ये केली. संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठाचा वापर पाकिस्तान कायमच भारताविरोधात गरळ ओकण्यासाठी केला जातो, अशीही टीका भारताने केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ‘शांततेची संस्कृती’ या विषयावर आज चर्चा झाली. यावेळी भारताच्या प्रतिनिधी विदिशा मैत्रा म्हणाल्या की, ‘शांततेची संस्कृती ही केवळ चर्चा करण्याची बाब नसून जगतील सर्व देशांनी मिळून ती निर्माण करण्याची बाब आहे. पाकिस्तान मात्र या व्यासपीठाचा वापर भारताविरोधातील त्यांचा अजेंडा राबविण्यासाठी वापर करत असून आजही त्यांच्या प्रतिनिधीने केलेल्या भाषणातून हे दिसून आले. वास्तविक, पाकिस्तानने त्यांच्या भूमीतच नाही, तर इतर देशांमध्येही हिंसाचाराच्या संस्कृतीला खतपाणी घातले आहे. त्यांच्या अशा सर्व प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो.’’

हेही वाचा: तेजस्वी यादव व चिराग पासवान येणार एकत्र? भेटीनंतर चर्चा

‘कोणत्याही धर्मात आणि संस्कृतीमध्ये दहशतवादाला स्थान नाही. मात्र, दहशतवादी हे आपल्या हिन कृत्यांचे समर्थन करण्यासाठी धर्माचा आधार घेतात. त्यांच्या या कृत्यांबाबत आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या देशांबाबत जगाने चिंता करायला हवी,’ असे ठाम मत विदिशा मैत्रा यांनी व्यक्त केले. पाकिस्तानचे प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी त्यांच्या भाषणात जम्मू-काश्‍मीर आणि सय्यद अली शाह गिलानी यांच्याबाबतच भाष्य केले. आजच्या चर्चासत्राशी या विषयाचा काहीही संबंध नव्हता.

loading image
go to top