... यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पाकने दिले निमंत्रण!

वृत्तसंस्था
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

भारतातील शीख भाविकांसाठी 9 नोव्हेंबर रोजी कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्याचे पाकिस्तानचे नियोजन आहे.

इस्लामाबाद : कर्तारपूर कॉरिडॉरच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्याचे निमंत्रण भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सोमवारी (ता.30) दिली. 

भारतातील शीख भाविकांसाठी 9 नोव्हेंबर रोजी कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्याचे पाकिस्तानचे नियोजन आहे. कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकिस्तानातील कर्तारपूर येथील दरबार साहीब आणि भारतातील पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक यांना परस्परांना जोडण्यात येणार आहे. या कॉरिडॉरच्या माध्यमातून भारतीय शीख भाविकांना कर्तारपूर साहीबला भेट देणे सुलभ होणार आहे. 

भव्य कार्यक्रमाद्वारे कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्‌घाटन करण्याचा पाकिस्तानचा विचार आहे. या कार्यक्रमासाठी डॉ. मनमोहनसिंग यांना आमंत्रित करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यांना अधिकृत निमंत्रण पाठविण्यात येणार आहे, असे कुरेशी यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. डॉ. सिंग यांनी भारतातील शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करावे. भारतीय शीख भाविकांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असेही कुरेशी म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : भाजपच्या मेगाभरतीत दोन नेत्यांचा प्रवेश

- सरकार पुन्हा ‘रिझर्व्ह बँके’च्या दारात; 30 हजार कोटींची मागणी?

- Vidhan Sabha 2019 : कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णींचे 'असे' होणार पुनर्वसन!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan invites to former Prime Minister Dr Manmohan Singh for Kartarpur Corridor inauguration