
पाकिस्तान ISI ने भारतात शस्त्रे पाठवण्यासाठी उभारली ड्रोन केंद्रे, लष्कराचा इशारा
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या (Pakistan) इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) भारतात शस्त्रे आणि ड्रग्सची तस्करी करण्यासाठी ड्रोन केंद्रे तयार करत आहेत. पाकिस्तानी रेंजर्सच्या साथीने गुप्तचर संस्थेने आतापर्यंत अशी सहा ड्रोन केंद्रे स्थापन केली आहेत. याबाबत इंटेलिजन्स सूत्रांच्या हवाल्यानं इंडिया टूडनं वृत्त दिलं आहे.
हेही वाचा: 'धर्मनिरपेक्षतेवर बुलडोझर चालवून भाजप देशात अनेक मिनी पाकिस्तान बनवतंय'
पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेच्या (IB) पलीकडे, ISI ने तस्कर आणि दहशतवाद्यांच्या मदतीने ड्रोन केंद्रे कार्यरत केली आहेत. फिरोजपूर आणि अमृतसर येथून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून अनेक पाकिस्तानी सीमा चौक्यांवर ड्रोनच्या हालचाली वाढल्या आहेत, असे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) च्या सूत्रांनी सांगितले. दहशतवादी आणि तस्कर या डमी ड्रोनमधून स्फोटके, शस्त्रे आणि दारूगोळ्याची वाहतूक पंजाबसारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक करत आहेत. ते त्यांच्या नापाक कारवायांसाठी GPS-नियंत्रण ड्रोनचा वापर वाढवत आहेत, असंही सांगितलं आहे.
पाकिस्तानी बाजूने ड्रोन हालचाली सुरू आहेत. त्यामुळे बीएसएफने अलर्ट जारी केला आहे. तसेच पंजाब सीमेवरील विशिष्ट, संवेदनशील ठिकाणी ड्रोनविरोधी यंत्रणा बसवत आहे. शत्रूची यूएव्ही नष्ट करण्यासाठी टीम तैनात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवर आतापर्यंत 53 ड्रोन घुसखोरीचे प्रकरण निदर्शनास आली आहेत. सुरक्षा दलांनी नऊ वेळा हे ड्रोन (यूएव्ही) खाली पाडले आणि त्यांच्याकडून स्फोटके आणि औषधे जप्त केली.बीएसएफने गेल्या तीन वर्षांत पंजाब सीमेवर सुमारे 1,150 किलो ड्रग्ज जप्त केल्याची माहिती आहे. या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान, बीएसएफने मोठ्या प्रमाणात हेरॉइनसह 150 किलो अंमली पदार्थ जप्त केले.
Web Title: Pakistan Isi Create Drone Center To Smuglling Drugs In India Says Sources
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..