
Viral Video: पाकिस्तानमध्ये भूकंपाचा फायदा घेत तुरुंगातून तब्बल २१६ कैदी पळून गेले आहेत. सोमवारी रात्री उशिरा कराचीला भूकंपाचा धक्का बसला. यावेळी सुरक्षेसाठी कैद्यांना त्यांच्या बराकीतून बाहेर काढून मुख्य गेटपर्यंत नेलं होतं. याचा फायदा घेत किमान २१६ कैदी पळून गेले. जियोच्या रिपोर्टनुसार तुरुंग अधीक्षकांनीच २१६ कैदी पळून गेले असल्याची माहिती दिलीय. ८० पेक्षा अधिक कैद्यांना पुन्हा पकडण्यात आलं. तर अजूनही काही कैदी फरार आहेत.