पाकिस्तान: हिंदू मंदिराच्या तोडफोड प्रकरणात 26 कट्टरपंथीयांना अटक, कोर्टानेही घातले लक्ष    

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 31 December 2020

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात 26 लोकांना अटक करण्यात आली आहे. लोकांना भडकवण्याचे काम करणाऱ्यांच्या विरोधात अद्यापही छापेमारी सुरु आहे.

पाकिस्‍तानमधील पख्तूनख्वा प्रांतामध्ये एका मौलवीच्या नेतृत्वाखाली कट्टपंथियांनी हिंदू मंदिराची तोडफोड केल्याचा प्रकार घडला. जाळपोळ करुन मंदिराची तोडफड केल्याप्रकरणी 26 लोकांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. 5 जानेवारीला सर्वोच्च न्यायालया या प्रकरणातील सुनावणी करणार आहे. 

पाकिस्तानमधील हिंदू समाजातून याप्रकरणात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. इम्रान सरकारने या प्रकरणात कठोर पावले उचलावीत यासाठी आंदोलनही करण्यात येत आहे.  हिंदू संत परमहंस महाराज यांच्या मंदिराला आग लावून तोडफोड करण्याचा प्रकार घडला. सिंध प्रांतातील हिंदू समुदायाचे लोक या ठिकाणी पूजा करण्यासाठी येत असतात.

पाकिस्तानात उद्धवस्त केलं ऐतिहासिक हिंदू मंदिर, जीर्णोद्धाराची मागितली होती परवानगी

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात 26 लोकांना अटक करण्यात आली आहे. लोकांना भडकवण्याचे काम करणाऱ्यांच्या विरोधात अद्यापही छापेमारी सुरु आहे. डॉन या पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार मदिरांची डागडुची करण्याची परवानगी मिळाल्यानंतर या मंदिरावर अशा प्रकारचा हल्ला झाला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan karak hindu temple destroyed many islamic radical arrests supreme court takes cognizance