
Pakistan Airstrike on Afghanistan
Esakal
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तालिबान यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळला आहे. शुक्रवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातली ४८ तासांची शस्त्रसंधी आणखी वाढवण्याच्या दोन्ही देशांच्या निर्णयानंतर काही तासातच रात्री उशिरा पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. पाकिस्तानने पक्तिका प्रांताच्या अनेक जिल्ह्यात हवाई हल्ले केले. या हल्ल्यात रहिवाशांच्या घरांना टार्गेट करण्यात आलं. यात महिला, मुलांसह ४० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३ क्रिकेटर्सचा समावेश असल्याची माहिती समजते.