गर्लफ्रेंडच्या बर्गरचा एक घास मित्राने खाल्ला; त्याचं डोकं सटकलं अन् उचललं टोकाचं पाऊल

गर्लफ्रेंडसाठी आणलेला बर्गर (Girlfriend Burger) मित्राने खाल्ल्याने एका व्यक्तीने आपल्या मित्रालाच संपवलं आहे.
Burger
Burger

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या (Pakistan) कराचीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्लफ्रेंडसाठी आणलेला बर्गर (Girlfriend Burger) मित्राने खाल्ल्याने एका व्यक्तीने आपल्या मित्रालाच संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कराचीमधील डिफेन्स एरिया पाचमध्ये ८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. 'एआरवाय न्यूज'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित प्रतिष्ठीत घरातून येतात. पीडित अली कैरिओ हा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा मुलगा आहे. तर, आरोपी डॅनियल नाझिर हा एसएसपीचा मुलगा आहे. डॅनियनने आपल्या गर्लफ्रेंडसाठी आणलेला बर्गर अलीने खाल्ला होता. त्यामुळे संतापलेल्या डॅनियलने अलीची गोळ्या घालून हत्या केली आहे. (Pakistan Man Kills Friend )

Burger
Rameshwaram Cafe Blast चे पाकिस्तान कनेक्शन, एनआयएला लागला ऑनलाइन हँडलरच्या ठिकाणाचा शोध

डॅनियलने गर्लफ्रेंड शाझिया हिला आपल्या घरी बोलावलं होतं. यावेळी डॅनियलचा मित्र अली कैरिओ आणि त्याचा भाऊ अहमेर देखील उपस्थित होता. आरोपीने दोन बर्गर ऑर्डर केले होते. तो आणि शाझिया हे दोघे बर्गर खाणार होते. पण, अलीने एका बर्गर थोडं खाल्लं. त्यामुळे डॅनियला संताप झाला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं.

Burger
Nashik Crime News : चाडेगावात एकावर ‘फायर’! युवक जखमी; गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार पसार

दोघांमधील वाद चिघळला. डॅनियलने सुरक्षा रक्षकाची बंदुक हिसकावली आणि अलीवर गोळ्या झाडल्या. यामध्ये अली गंभीर जखमी झाला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपासानंतर पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाला जबाबदार धरलं आहे. डॅनियलला अटक करण्यात आली असून कोर्टात सुनावणी सुरु आहे.

दरम्यान, सदर घटनेमुळे चर्चा सुरु झाली आहे. एका साध्या बर्गरसाठी मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. डोकं शांत ठेवून त्याने निर्णय घ्यायला हवा होता असं लोक म्हणत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com