

Pakistan Market Bomb Blast Kills 9, Leaves 30 Injured Near Afghan Border
esakal
पाकिस्तानातील एका गजबजलेल्या बाजारात मंगळवारी झालेल्या भीषण स्फोटात किमान नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असून, तीस जण जखमी झाले आहेत. ही घटना पाकिस्तानच्या लक्की मारवत जिल्ह्यातील सराई नौरंग या शहरात घडली. हा भाग अफगाणिस्तानच्या सीमेवर वसलेला आहे.