पाकिस्तानातील 'बत्ती गुल'मागे भारताचा हात; पाक मंत्र्याचा हास्यास्पद दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 10 January 2021

शनिवारी पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये बत्ती गुल झाली होती.

इस्लामाबाद- शनिवारी पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये बत्ती गुल झाली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे पाकिस्तानमध्ये शनिवारी रात्री अचानक एकाचवेळी वीज गेल्याचा प्रकार पाहायला मिळाला. असे असले तरी पाकिस्तानने या घटनेसाठी नेहमीप्रमाणे भारताला जबाबदार धरलं आहे. पाकिस्तान सरकारमधील मंत्री शेख रशीद यांनी पुन्हा भारतावर निशाणा साधला आहे. रशीद आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चत असतात. 

दुर्घटनाग्रस्त इंडोनेशियन विमानाचे सापडले अवशेष; प्रवाशांचा शोध सुरु

पाकिस्तानची वीज भारताने घालवली होती, जेणेकरुन देशाची राजधानी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावरुन जगाचं लक्ष हटवता येईल, असं हास्यास्पद वक्तव्य रशीद यांनी केलं आहे. शनिवारी कराची, इस्लामाबाद, लाहौर, पेशावर आणि रावलपिंडीसह अनेक प्रमुख शहरांची वीज अचानक गेली होती. त्यामुळे ही सर्व शहरे अंधारात बुडाली होती. त्यानंतर उर्जा मंत्र्यांनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली की, ट्रान्समिशन सिस्टममध्ये फ्रीक्वेंसी अचानक 50 पासून 0 झाल्याने देशव्यापी ब्लॅकआऊट झाला होता.  

रशीद यांनी याधीही केलंय वक्तव्य

रशीद यांनी याआधीही हास्यास्पद वक्तव्यं केली आहेत. रशीद यांनी अनेकवेळा भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली आहे. त्यांनी दावा केलाय की भारताची गुप्तचर संस्था  RAW पाकिस्तानच्या नेत्यांना संपवण्याचा कट रचत आहे. रशीद यांनी असाही दावा केला होता की, माजी पंतप्रधान नवाज शरीफ भारताचे एजेंट आहेत आणि नरेंद्र मोदींना देशाच्या बाहेर जाऊन फोन करतात. 

अभिमानास्पद! NASAच्या स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्याने मारली बाजी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे सहाय्यक शाहबाज गिल यांनी म्हटलं की उर्जा मंत्री उमर अयूब आणि त्यांची पूर्ण टीम या ब्रेकडाऊनवर काम करत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2015 च्या जानेवारीमध्ये देखील याचप्रकाची घटना पाकिस्तानमध्ये घडली होती. पाकिस्तानमध्ये टेक्निकल अडचणींमुळे अनेक तासांपर्यंत वीज नसल्याने खोळंबा झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, तीन तासानंतर रात्री साधारण दोन वाजता काही शहरांमध्ये वीज परतली. 

दरम्यान, देशव्यापी ब्लॅकआऊट झाल्यानंतर ट्विटरवर काल रात्री अचानकच #blackout हॅश्टॅग ट्रेंड होताना दिसून आला. एकावेळी संपूर्ण पाकिस्तानमध्ये याप्रकारची घटना घडणे लज्जास्पद असल्याने काही वेळातच ट्विटरवर ब्लॅकआऊट हा हॅश्टॅग ट्रेंड होऊ लागला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan minister sheikh rasheed says india hindered power supply blackout