
नासाने ऍप विकसित करण्याची एक स्पर्धा आयोजित केली होती.
नवी दिल्ली- नासाने ऍप विकसित करण्याची एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमतील विजेत्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा समावेश आहे. गुरुग्रामच्या हायस्कूलमधील विद्यार्थी आर्यन जैन याने ही स्पर्धा जिंकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन जैन याने यावर्षी नासाच्या ''आर्टेमिस नेक्स्ट-जेन स्टेम-मून टू मार्स ऍप डेवलपमेंट चॅलेंज'' स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने ही स्पर्धा जिंकली आहे.
अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबत अपयशी ठरले, विनायक मेटेंचा घणाघाती आरोप
आर्यन गुरुग्राम (हरियाणा)च्या सननिटी स्कूलचा विद्यार्थी आहे. अमेरिकीतील हायस्कूलच्या सहा विद्यार्थ्यांची एक टीम बनवण्यात आली होती. यात आर्यन जैन याचाही समावेश होता. या सहा विद्यार्थ्यांच्या टीमने क्रॉस-प्लॅटफॉर्म गेम इंजन यूनिटीचा उपयोग करण्यासाठी ऍप विकसित केले आहे. नासाच्या अंतराळ संचार आणि नेविगेशन (एससीएएन) टीमद्वारा आयोजित या वर्षीच्या स्पर्धेत, स्पर्धकांना मिशन योजना आणि अन्वेषण गतिविधींच्या साहाय्याने एक ऍप विकसित करायचे होते.
नासा 2024 मध्ये महिला आणि पुरुष अंतराळवीरांना चंद्रावर उतरवणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऍप तयार करायचे होते. अंतराळवीरांना चंद्राचा दक्षिण पोल स्पष्टपणे दिसावा आणि त्यांना मिशनमध्ये सहायता मिळावी, यासाठी या ऍपला महत्व आहे. सहा विद्यार्थ्यांनी आपलं कौशल्य दाखवत नासाच्या आवश्यकतेनुसार ऍप तयार करुन दिलं आहे. स्पर्धेमध्ये जगभरातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पण, सहा विद्यार्थ्यांचे ऍपच नासाच्या कसोटीवर खरे उतरले.
Breakfast Updates: पाकिस्तानात ब्लॅकआऊट ते भारत बायोटेकचं स्पष्टीकरण, वाचा...
सहा विद्यार्थ्यांच्या टीमने नासाच्या अंतराळ संचार आणि नेविगेशन (एससीएएन) टीमच्या अपेक्षेनुसार ऍप तयार केले आहे. त्यामुळे त्यांना स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित करण्यात आले. जगभरातून आपेल्या विद्यार्थ्यांमधून सहा जणांची निवड झाली. सन्मानाची गोष्टी म्हणजे यात एका भारतीय विद्यार्थ्याचा समावेश आहे. आर्यन जैन याचे कौतुक होत असून त्याच्या स्कूलने ही अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.