'ऑक्टोबरमध्ये होणार भारत-पाक युद्ध'

वृत्तसंस्था
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

ऑक्टोबरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य पाकिस्तानच्या एका मंत्र्यांने केले आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीत अहमद यांनी भारतासोबत युद्ध होणार असल्याचा दावा केला आहे.

इस्लामाबाद : ऑक्टोबरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य पाकिस्तानच्या एका मंत्र्यांने केले आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीत अहमद यांनी भारतासोबत युद्ध होणार असल्याचा दावा केला आहे.

शेख रशीत म्हणाले की, हे युद्ध ऑक्टोबर किंवा त्यानंतर होणार आहे. नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. काश्मीर हा विषय आंतरराष्ट्रीय करण्याचा पाकिस्तानने अनेक प्रयत्न केला. पण पाकिस्तानला त्यात यश आले नाही. त्यानंतर पाकिस्तानमधील मंत्र्यांने केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
 

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखिल भारताला अण्विक युद्धाची धमकी दिली आहे. अर्थात पाकिस्तानकडून झालेले अशा प्रकारचे हे पहिले वक्तव्य नाही. पाकिस्तान काश्मिरी लोकांच्या अधिकारासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो अशा प्रकारचे वक्तव्य अनेक पाकिस्तानी व्यक्तींनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan minister Sheikh Rashid warns of full-blown war with India in October