पाकिस्तानचा मंत्री म्हणतो, अणुहल्ला करू; भारताला धमकी

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

आता केवळ अण्विक युद्ध होईल, परंपरागत पद्धतीने युद्ध केले जाणार नाही. आता 4-6 दिवस टँक, तोफा चालतील असे युद्ध केले जाणार नाही, आता केवळ अण्विक युद्ध होईल. यापूर्वी मी 126 दिवस आंदोलनात सहभागी होतो. त्यावेळी देशातील परिस्थिती वेगळी होती.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी देत, अणुहल्ला करू असे म्हटले आहे.

भारताने रविवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये उखळी तोफांचा मारा करून दहशतवाद्यांना ठार केले होते. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे सैनिकही ठार झाले होते. त्यानंतर शेख रशीद यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचे नाव न घेता पुन्हा एकदा अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. 

रशीद म्हणाले, की आता केवळ अण्विक युद्ध होईल, परंपरागत पद्धतीने युद्ध केले जाणार नाही. आता 4-6 दिवस टँक, तोफा चालतील असे युद्ध केले जाणार नाही, आता केवळ अण्विक युद्ध होईल. यापूर्वी मी 126 दिवस आंदोलनात सहभागी होतो. त्यावेळी देशातील परिस्थिती वेगळी होती. आता एअर टँकने हल्ला किंवा नौदलाकडून हल्ला केला जाणार नाही. ज्याप्रकारची गरज असेल त्या प्रकारे अण्विक हल्ला केला जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan minister warns Tanks or cannons will not work, now nuclear war will happen

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: