पाकच्या मिसाइलचा फुसका बार; लाँच होताच कोसळले | Missile test by Pakistan fails | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan missile test | Pakistan News

मिसाइल लाँच केल्यानंतर काही वेळातच अनियंत्रित झाले आणि सिंध प्रांतातील एका भागात पडले.

पाकच्या मिसाइलचा फुसका बार; लाँच होताच कोसळले

पाकिस्तानने गुरुवारी त्यांच्या मिसाइलची चाचणी घेतली. मात्र या चाचणीत ते अयशस्वी ठरले आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सिंधमधील जमशोरो भागात काल दुपारी १२ च्या सुमारास नागरिकांना एक अनोळखी वस्तू आकाशातून पडताना दिसली. ही वस्तू रॉकेट किंवा मिसाइल सारखी होती. पाकिस्तानच्या सिंधमधील टेस्टिंग रेंजवरून मिसाइल डागण्यात आलं होतं. आधी याची चाचणी ११ वाजता करण्यात येणार होती मात्र, तांत्रिक अडचणीमुळे १ तास उशिरा १२ वाजता करण्यात आली.

मिसाइल लाँच केल्यानंतर काही वेळातच अनियंत्रित झाले आणि सिंध प्रांतातील एका भागात पडले. काही पाकिस्तानी न्यूज चॅनेल्सनी या घटनेचे वार्तांकन केले. यानंतरही पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून मिसाइलच्या चाचणीबाबत कोणतेही वक्तव्य आलेलं नाही.

स्थानिक प्रशासनाने मात्र मिसाइलची चाचणी अयशस्वी झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. त्यांनी म्हटलं की, हे एक नियमती मोर्टार ट्रेसर राऊंडचा भाग होते. जे सीमेजवळून डागण्यात आलं होतं. पाकमधील कॉन्फ्लिक्ट न्यूजच्या वृत्तानुसार, भारताकडून चुकून डागण्यात आलेल्या मिसाइलच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने ही मिसाइल चाचणी केली. पाकिस्तानी मिसाइल त्याचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले आणि लाँच पॅडपासून जवळच कोसळले.

टॅग्स :Pakistanimran khan