Russia Ukraine War : रशियाचा शाळा, सांस्कृतिक केंद्रावर हल्ला; किमान २१ जण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ukraine Russia war at least 21 people died in east Ukraine town by russian shelling

Russia Ukraine War : रशियाचा शाळा, सांस्कृतिक केंद्रावर हल्ला; २१ जण ठार

ukraine russia war : रशियन सैन्य आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने आता धोकादायक वळण घेतले आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या विविध भागात हवाई हल्ले करत आहेत. पूर्व युक्रेनमधील एका शहरावर गुरुवारी रशियन सैन्याच्या गोळीबारात किमान 21 लोक ठार आणि 25 जखमी झाले. असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनविरोधात रशियाच्या युद्धाचा हा चौथा आठवडा आहे, या युध्दात आतापर्यंत शेकडो लोक मरण पावले आणि हजारो जखमी झालेत.

गुरुवारी पहाटे, रशियन सैन्याने हवाई हल्ल्यात खारकिव्ह जवळील मेरेफा शहरातील शाळा आणि सांस्कृतिक केंद्र नष्ट केले, असे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 25 जण जखमी झाले असून त्यापैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

एका सोशल मीडिया पोस्टमध्ये हवाई हल्ल्यानंतर उद्ध्वस्त झालेली एक बहुमजली इमारतीचा फोटो दाखवण्यात आला आहे. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. खारकीव्ह हे युक्रेनमधील दुसरे मोठे शहर आहे. विशेष म्हणजे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन 22 दिवस झाले आहेत. या युद्धात युक्रेन सातत्याने रशियन सैन्यावर लोकांची हत्या केल्याचा आरोप करत आहे.

टॅग्स :Russia Ukraine Crisis