शरीफ कुटुंबीयांना पुन्हा न्यायालयाचे समन्स

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ व त्यांच्या दोन मुलांना भ्रष्टाचाराच्या आणखी दोन प्रकरणांत न्यायालयाने नोटीस बजावून 19 सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ व त्यांच्या दोन मुलांना भ्रष्टाचाराच्या आणखी दोन प्रकरणांत न्यायालयाने नोटीस बजावून 19 सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

"पाक'च्या नॅशनल अकाउंटॅबिलिटी ब्युरोने (एनएबी) गेल्या आठवड्यात शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांवर, तसेच अर्थमंत्री इशाक दार यांच्याविरोधात चार विविध खटले दाखल केले आहेत. भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने अझीझिया स्टील मील, हिल मेटल आणि एवनफील्ड मालमत्ताप्रकरणी आज नवाज शरीफ त्यांची मुले हसन, हुसेन, मुलगी मरियम आणि जावई मोहंमद सफदार यांना 19 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले. ब्रिटनमधील एका कंपनीतील भ्रष्टाचारप्रकरणी काल (ता. 13) याच न्यायालयाने शरीफ व कुटुंबीयांना 19 सप्टेंबर रोजी पाचारण केले आहे. ही सर्व प्रकरणे पनामा पेपर्सप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी संबंधित आहेत.

Web Title: pakistan news Court summons Sharif family