श्रीदेवीः पाकने काढले भारतीय प्रसारमाध्यमांचे धिंडवडे

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

इस्लामाबादः अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी कोणत्याही परिस्थितीचे भान न ठेवता विविध वृत्त प्रसारित केले आहेत. अतिशोयक्तपणे वृत्त प्रसारित केल्याबद्दल पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारतीय प्रसारमाध्यमांचे धिंडवडे काढले आहेत.

श्रीदेवी यांच्या निधनानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करताना बेजबाबदार पणा केलेला दिसून आला. यामध्ये टीव्ही चॅनेल, ऑनलाइन संकेतस्थळे व सोशल मिडियाचा समावेश आहे.

विविध टीव्ही चॅनेलने बेजबाबदारपणे वार्तांकन केलेले दिसून आले. यामागे केवळ टीआरपी वाढविण्याचा हेतू दिसत होता. शवविच्छेदनाचा अहवाल हाती येण्यापूर्वीच वेगवेगळे तर्क-वितर्क लावताना वाहिन्या दिसत होत्या. वृत्तवाहिन्यांचे व्हिडिओ व माहिती सोशल मिडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती.

आज तक या वृत्तवाहिनीने तर 'मौत का बाथटब' दाखवून पत्रकारितेचे धिंडवडेच काढले. सीएनएन न्यूज 18 या वृत्तवाहिनीने तर फोटो शॉपचा वापर करून बाथटबमध्ये श्रीदेवीचे छायाचित्र दाखवले. एका वाहिनीने तर चक्क दारूचा प्यालाच दाखवला.

टीव्ही 9 या तेलगू वाहिनीने बाथटबमध्ये श्रीदेवी पडलेल्या व त्यांचे पती बोनी कपून बाजूला दाखवले. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीने श्रीदेवी यांचे बाथरूमधील शेवटचे 15 मिनिटे दाखवले. विविध वृत्तवाहिन्यांनी चुकीच्या पद्धतीने वार्तांकन केल्याचे दिसून आले. शिवाय, श्रीदेवी यांचा शवविच्छेदनाचा अहवाल हाती येण्यापूर्वी विविध वृत्तवाहिन्यांवर लाइव्ह चर्चा करताना अनेकांनी अकलेचे कांदे तोडले, असे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan news Indian media failed actress sridevi after her death says pakistan media