सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास शरीफ कुटुंबीयांचे आव्हान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

इस्लामाबाद: "पनामा पेपर्स'शी संबंधित बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबीयांनी आव्हान दिले. या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी करणारी याचिका शरीफ यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांच्यावर कोणतेही सार्वजनिक पद भूषविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई केली होती. तसेच, संबंधितांवर खटले दाखल करून त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यानंतर शरीफ यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या निर्णयावर न्यायालयाने फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका शरीफ यांची मुले हसन व हुसेन, मुलगी मरियम आणि जावई मोहंमद सफदार यांनी वकील सलमान अक्रम राजा यांच्यामार्फत दाखल केली आहे.

सदर याचिकेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या संयुक्त तपास पथकाच्या (जेआयटी) कामाबाबत तसेच, भ्रष्टाचारविरोधी विशेष विभागाकडून (एनएबी) सुरू असलेल्या चौकशीवर सर्वोच्च न्यायालयाच्या पीठातील एक न्यायाधीश पर्यवेक्षक म्हणून काम पाहतील, या निर्णयावरही आक्षेप घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: pakistan news nawaz sharif family and court