हक्कानीचे पुरावे द्या; आपण नष्ट करू

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पाकिस्तानचे अमेरिकेला आवाहन; ट्रम्प यांच्या टीकेची दखल

इस्लामाबाद: दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्क पाकिस्तानात सक्रिय असल्याचे पुरावे अमेरिकेने दिल्यास पाकिस्तान हे नेटवर्क उद्‌ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेबरोबर संयुक्त मोहीम राबवण्यास तयार आहे, असे आवाहन पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी केले आहे. दहशतवाद्यांना आश्रय दिला जात असल्याच्या कारणावरून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तान एकटा पडला असून त्यातून सावरण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानवर कठोर टीका केल्यानंतर असिफ यांनी मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान गेल्या 17 वर्षांपासून दहशतवाद आणि अराजकता निर्माण करणाऱ्या घटकांना आणि अफगाणिस्तानातील अमेरिकी सैनिकांच्या शत्रूंना आश्रय देत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. यास अनुसरून अलीकडेच अमेरिकेत ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या संदर्भात असिफ यांनी पत्रकारांना सांगितले, की अमेरिकी अधिकाऱ्यांना हक्कानी नेटवर्कबाबत पुरावे घेऊन पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण दिले आहे. जर त्यांना हक्कानी नेटवर्कचे पुरावे आढळून आले, तर पाकिस्तानचे सैन्य अमेरिकेसमवेत संयुक्त मोहिमेत सहभाग घेऊन नेटवर्क मोडून काढेल. अमेरिकेच्या टीकेबाबत असिफ म्हणाले, की जर ट्रम्प प्रशासनाने दबाव टाकला तर आपले मित्र देश विशेषत: चीन, रशिया, इराण आणि तुर्कस्तान हे आपल्या बाजूने उभे राहतील. अमेरिकेचे संरक्षण आणि परराष्ट्रमंत्री पाकिस्तानवर हुकूमशाही गाजवण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यास झुगारून पाकिस्तानच्या हितासाठी निर्णय घेतले जाईल.

Web Title: pakistan news pakistan usa donald trump hukkani network