'पनामा पेपर्स'प्रकरणी चौकशी अहवाल सादर

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

शरीफ कुटुंबीयांची "जेआयटी'कडून झाली होती चौकशी

इस्लामाबाद: "पनामा पेपर्स'प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करणाऱ्या संयुक्त चौकशी पथकाने (जेआयटी) आपला अंतिम अहवाल आज पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्त केला आहे.

"जेआयटी'चे प्रमुख वाजिद झिया यांनी अंतिम अहवाल पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाकडे सोपवला. या अहवालात नेमके काय आहे, याची माहिती उघड करण्यात आलेली नसली तरी अहवालाच्या प्रती शरीफ कुटुंबीयांसह या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

या अहवालाचे दहा विभाग करण्यात आले असून, त्यापैकी दहावा विभाग हा गोपनिय ठेवावा, अशी विनंती झिया यांनी केली आहे. दहाव्या विभागात परकी सरकारशी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान तेहरिके इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी अहवालाचे नऊ भाग सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाची सुनावणी पुढील सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली. "पनामा पेपर्स'प्रकरणात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर करण्यात आलेला होता. या प्रकरणी "जेआयटी'कडून पंतप्रधान शरीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली होती.

Web Title: pakistan news panama papers and nawaz sharif