'प्रवेशबंदी'च्या यादीत पाकिस्तानचा समावेश?

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

अमेरिकेकडून प्रथमच शक्‍यता व्यक्त

वॉशिंग्टन- मूलतत्त्ववादी इस्लामिक दहशतवाद्यांना अमेरिकेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने सात मुस्लिम देशांमधील नागरिकांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच घेतला. भविष्यात यात पाकिस्तानचाही समावेश होऊ शकतो, असे ट्रम्प प्रशासनाने प्रथमच सूचित केले आहे.

अमेरिकेकडून प्रथमच शक्‍यता व्यक्त

वॉशिंग्टन- मूलतत्त्ववादी इस्लामिक दहशतवाद्यांना अमेरिकेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने सात मुस्लिम देशांमधील नागरिकांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच घेतला. भविष्यात यात पाकिस्तानचाही समावेश होऊ शकतो, असे ट्रम्प प्रशासनाने प्रथमच सूचित केले आहे.

व्हाइट हाउसचे मुख्य अधिकारी रेइन्स प्रिबस म्हणाले, ""ज्या देशांमध्ये कट्टरतावादी इस्लामिक दहशतवाद फोफावला आहे, अशा सात देशांची नावे दोन्ही सभागृहातील सदस्य व माजी अध्यक्ष ओबामा यांच्या प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केली होती. त्या आधारेच या देशांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला.'' ट्रम्प यांच्या या वादग्रस्त आदेशावर शुक्रवारी (ता.27) सह्या करण्यात आल्या. तेव्हापासून निर्वासितांबाबतची अमेरिकेची मोहीम 120 दिवसांसाठी थांबविण्यात आली आहे. सीरियातून येणाऱ्या निर्वासितांवर बेमुदत काळासाठी बंदी घालण्यात आली असून, इराक, इराण, लीबिया, येमेन, सुदान, सीरिया व सोमालिया या देशांमधील नागरिकांच्या अमेरिकेत प्रवेशावर कायमची बंदी घातली आहे.

"" पाकिस्तान व अन्य काही देशांमध्येही दहशतवादाला पाठबळ दिले जाते. या देशांमधील नागरिकांची अमेरिकेत प्रवेश करण्यापूर्वी व अमेरिकेतून बाहेर पडण्यापूर्वी सखोल तपासणी केली जाईल, तसेच त्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखले जाण्याची शक्‍यता आहे,'' असे प्रिबस यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे "प्रवेशबंदी'च्या यादीत पाकिस्तानचा समावेश करण्याची शक्‍यता ट्रम्प प्रशासनाने प्रथमच जाहीरपणे व्यक्त केली.

ट्रम्प यांनी हा निर्णय एकाएकी घेतला नसून, नियोजनपूर्वक हे पाऊल उचललेले आहे. आम्हाला याबाबत जगभरात जाहिरातबाजी करण्याची आवश्‍यकता नाही. हा आदेश काढण्यापूर्वी तीन दिवसांचा इशारा द्यावा, अशी सूचना काहींनी केली होती. मात्र, असे केले असते तर त्या तीन दिवसांत दहशतवाद्यांनी प्रवासाच्या योजना आखल्या असता. हे सात देश म्हणजे दहशतवाद्यांचे अड्डे असून, प्रशिक्षण केंद्रे आहेत. अमेरिकेच्या नागरिकांचे रक्षण करणे हे आमचे पहिले प्राधान्य असल्याचे सांगून प्रिबस यांनी "प्रवेशबंदी'च्या निर्णयाचे समर्थन केले.

Web Title: Pakistan no entry in usa list?