
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानच्या नेत्यांकडून पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय हास्यास्पद दावेही केले जात आहेत. दरम्यान, भारतीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न सुरू आहे. जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या अनेक शहरांमध्ये हल्ले केले. पाकिस्तानने या ऑपरेशनला बुन्यान-ए-मर्सूस असं नाव दिलंय.