कुलभूषण जाधव यांना दाद मागता येणार, पाकिस्तानी संसदेत विधेयक मंजूर | Kulbhushan Jadhav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kulbhushan Jadhav

कुलभूषण जाधव यांना दाद मागता येणार, पाकिस्तानी संसदेत विधेयक मंजूर

लाहोर: हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात बंद असलेले कुलभूषण जाधव (Kulbhushan jadhav) यांना आता त्यांच्या विरोधातील निकालावर दाद मागण्याचा अधिकार मिळाला आहे. या संदर्भात पाकिस्तानी संसदेत (Pakistan parliament) एक विधेयक मंजूर (Billed pass) करण्यात आलं आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या (ICJ) निर्णयानुसार हे विधेयक मंजूर झाले आहे.

भारतीय कैदी कुलभूषण जाधव यांना दाद मागण्याचा अधिकार देण्यासाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीने १० जूनला एक विधेयक स्वीकारले होते. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालानुसारच हे विधेयक आणण्यात आलं होतं. परिमाणकारक आढावा आणि पूनर्विचाराचा अधिकार मिळाला पाहिजे, असे आयसीजेने निर्देश दिले हेते.

हेही वाचा: फ्लॅट शोधणाऱ्या महिला अधिकाऱ्याकडे सेक्सची मागणी, मुंबईतील घटना

कुलभूषण जाधव प्रकरणात आयसीजेने दिलेल्या निकालानुसार, २०२० मध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान सरकारने एक अध्यादेश काढला होता. कुलभूषण जाधव हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली सन २०१७ मध्ये पाकिस्तानातील लष्करी न्यायालायने कुलभूषण जाधव यांना देहदंडाची शिक्षा ठोठावली होती.

हेही वाचा: 'हा माझ्या घरचा मामला, माझ्या मुलांचा...', वादावर भाई जगतापांची भावना

जाधव यांना साधा वकिलही न देणाऱ्या आणि त्यांच्या मृत्यू दंडाच्या शिक्षेविरोधात भारताने थेट आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका दाखल केली होती. शिक्षेचा पाकिस्तानने आढावा घेऊन फेरविचार करावा व भारतीय दूतावासाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची परवानगी द्यावी, असा निकाल आयसीजेने दिला होता.

loading image
go to top