मुशर्रफ म्हणतात, काश्मीर हे पाकिस्तानच्या रक्तात

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाची स्थापना केली होती. 2007मध्ये पाकिस्तानच्या राज्य घटनेचा भंग केल्या प्रकरणी त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा खटला सुरू आहे. पण, सध्या दुबईत असलेले मुशर्रफ अधून-मधून पाकिस्तानातील राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ पुन्हा सक्रीय राजकारणात आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी काश्मीर प्रश्नावर वक्तव्य करून, पाकिस्तानातील नागरिकांचे लक्ष वेधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. 

पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाची स्थापना केली होती. 2007मध्ये पाकिस्तानच्या राज्य घटनेचा भंग केल्या प्रकरणी त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा खटला सुरू आहे. पण, सध्या दुबईत असलेले मुशर्रफ अधून-मधून पाकिस्तानातील राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात.

पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मुशर्रफ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यात त्यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतरची मुशर्रफ यांची ही पहिली सार्वजनिक प्रतिक्रिया आहे. मुशर्रफ म्हणाले, 'काश्मीर हे पाकिस्तानच्या रक्तात आहे.

कोणत्याही परिस्थितीत अखेरपर्यंत आपण, काश्मिरी जनतेच्या बाजूने उभे राहू.' मुशर्रफ सध्या वैद्यकीय उपचारांच्या निमित्ताने दुबईत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Pervez Musharraf back in active politics statement on kashmir