पाकिस्तानने पुन्हा मागितली भीक; आता हवंय एवढं कर्ज

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 मे 2020

पाकिस्नानने पुन्हा एकदा भीक मागितली असून पाकिस्तान सरकारसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान जागतिक वित्तीय संस्थांकडे कर्ज मागणार आहे.

इस्लामाबाद : पाकिस्नानने पुन्हा एकदा भीक मागितली असून पाकिस्तान सरकारसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान जागतिक वित्तीय संस्थांकडे कर्ज मागणार आहे. पाकिस्तानची तिजोरी झपाट्याने रिकामी होत असल्याने कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला मदतीची आवश्यकता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पाकिस्ताननं जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे. त्यांनी मागितलेलं हे कर्ज जी २० देशांकडून मागण्यात आलेल्या कर्जाच्या तुलनेत अधिक आहे. पाकिस्ताननं जी २० देशांकडून १.८ अब्ज डॉलर्सच्या मदतीची मागणी केली आहे. आशियाई विकास बँकेनं पाकिस्तानला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपात्कालिन कर्ज म्हणून ३०.५ कोटी रूपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे कोरोनाविरोधात लढण्यासाठी आवश्यक उपकरणं, तसंच गरीब महिलांना आर्थिक मदतही करण्यात येणार आहे.
--------
१९९९पासून आतापर्यंतच्या चक्रीवादळावर एक नजर
--------
भारताचा भूभाग आपल्या नकाशात दाखवण्याचं धाडस
--------
सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार
---------
पाकिस्तान यावर्षी २ हजार ८०० अब्ज रुपयांची रक्कम केवळ कर्ज फेडण्यासाठीच करेल, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ या पक्षाचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळी पाकिस्तानवरील सार्वजनिक कर्जाचा बोजा २४ हजार ८०० लाख कोटी रूपये होता. त्यात आता झपाट्यानं वाढ होत आहे.

जीडीपीच्या ९० टक्के कर्ज
आशियाई विकास बँक काही अटींद्वारे पाकिस्तानला कर्जाची रक्कम वाढवून देणार आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधून १.३९ अब्ज डॉलर्सचं आपात्कालिन कर्ज आणि जागतिक बँकेकडूनही २० कोटी डॉलर्सची मदत मिळाली होती. दरम्यान, जूनपर्यंत पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा वाढून तो ३७ हजार ५०० अब्ज पाकिस्तानी रुपये किंवा जीडीपीच्या ९० टक्के होणार असल्याच्या शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan plans to seek $2 billion in loans from World Bank