अमेरिकेची २ आठवडे युद्धबंदी! पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कॉपी पेस्ट ट्विट; स्क्रीप्ट ट्रम्पनी लिहून दिली?

Pakistan PM's Tweet इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धबंदी संदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शरीफ यांनी ट्विट कॉपी पेस्ट केल्यानं त्याबाबत प्रश्न उपस्थित होतायत.
अमेरिकेची २ आठवडे युद्धबंदी! पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कॉपी पेस्ट ट्विट; स्क्रीप्ट ट्रम्पनी लिहून दिली?
Updated on

इराण विरूद्धच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांनी एक संस्कृती नष्ट करू असं म्हणत इशारा दिला होता. मात्र त्यांनी आता २ आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुखांनी इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. याबाबत ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीय. पण यात चर्चा होतेय ती पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या ट्विटची. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेबाबत शरीफ यांनी पोस्ट केली होती. पोस्ट करण्यासाठीचा जो ड्राफ्ट होता तो शरीफ यांनी थेट कॉपी पेस्ट केल्याचं दिसून येतंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com