Pakistan killed TLP members : भयानक! पाकिस्तानी रेंजर्स अन् पोलिसांनी अवघ्या तीन तासांत जवळपास ३०० जण मारले

Massive Clash Between Pakistan Rangers and TLP Supporters : या मोठ्या नरसंहारात तब्बल १९०० पेक्षा जास्त निःशस्त्र लोक गोळी लागल्याने जखमी झाले आहेत.
Security forces in Pakistan during an intense operation where hundreds were reportedly killed within hours, sparking global outrage over human rights violations.

Security forces in Pakistan during an intense operation where hundreds were reportedly killed within hours, sparking global outrage over human rights violations.

esakal

Updated on

Pakistan Rangers and Police Action against TLP Clash : पाकिस्तानच्या मुरीदके शहरात आज(सोमवार) पाकिस्तानी रेंजर्स अन् पाकिस्तानी पोलिसांनी मिळून मोठा नरसंहार घडवला आहे. अवघ्या तीन तासांत जवळपास ३०० जणांना ठार मारलं आहे. या नरसंहारात १९०० पेक्षा जास्त निःशस्त्र लोक गोळी लागल्याने जखमी झाले आहेत.

हा गोळीबार पाकिस्तानी रेंजर्स आणि पाकिस्तानी पोलिसांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील शेखपुरा जिल्ह्यात येणाऱ्या वाले मुरीदके शहरात केला. जिथे तहरीक ए लब्बैक पाकिस्तान (TLP) नावाच्या कट्टरवादी संघटनेचा ताफा इस्लामबादच्या दिशेने अमेरिका आणि इस्रायलचा विरोध करण्यासाठी जाणार होता आणि लाहोरवरून निघाला होता.

भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजता पाकिस्तानी रेंजर्स आणि पोलिसांनी टीएलपीच्या हजारो कार्यकर्त्यांना इस्लामाबादला जाण्यापासून रोखण्यासाठी आधी स्मोक ग्रेनेड फेकले आणि नंतर मग हजारो आंदोलकांवर सकाळी ९ वाजेपर्यंत गोळीबार केल्याची माहिती आहे. घटनास्थळी मोठ्याप्रमाणात टीलएलपीच्या सदस्यांचा मृतदेहाचा खच पडून होता.

Security forces in Pakistan during an intense operation where hundreds were reportedly killed within hours, sparking global outrage over human rights violations.
Government Employees PF : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पीएफ व्याजदरांबाबत नवीन अपडेट ; अर्थ मंत्रालयाकडून अधिसचूना जारी!

एवढच नाहीतर पाकिस्तानी रेंजर्स आणि पोलिसांनी मिळून टीएलपीचा मंचही जाळून टाकला. टीएलपीचा अशाही दावा आहे की, पोलिस आणि रेंजर्सच्या गोळीबारात त्यांचे प्रमुख मौलाना साद हुसैन रिझवी यांनाही गोळी लागली आहे.

Security forces in Pakistan during an intense operation where hundreds were reportedly killed within hours, sparking global outrage over human rights violations.
Namibia historic win Video : नामिबियाच्या धडाकेबाज बॅट्समनने रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारला कडक चौकार अन् घडवला इतिहास!

गाझा शांतता कराराच्या निषेधार्थ, टीएलपीने गेल्या शुक्रवारी हजारो सदस्यांसह लाहोरहून इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासाकडे अमेरिका आणि इस्रायलचा निषेध करण्यासाठी मार्च काढला होता. टीएलपीने या मार्चला लब्बैक किंवा अक्सा मार्च असे नाव दिले होते. शुक्रवारी मार्च सुरू होताच पोलिस आणि रेंजर्सनी लाहोरमध्ये गोळीबार केला, ज्यामुळे त्या दिवशी १५ लोकांचा मृत्यू झाला, तरीही मौलाना साद हुसेन रिझवी यांच्या नेतृत्वाखालील तहरीक-ए-लब्बैक मार्च सुरूच राहिला आणि शनिवारी रात्री मुरीदके येथे पोहोचला होता.

यानंतर जेव्हा पाकिस्तानचे शाहबाज सरकार आणि टीएलपी यांच्यातील वाटाघाटी अयशस्वी झाल्या आणि टीएलपी इस्लामाबादकडे कूच करण्यावर ठाम राहिला, तेव्हा काल रात्री ११ वाजता टीएलपी प्रमुख मौलाना साद रिझवी यांनी सकाळी इस्लामाबादकडे कूच करण्याची घोषणा केली. त्यानंतर, मार्च सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानी सुरक्षा दलांनी नि:शस्त्र निदर्शकांना एके-४७ ने ठार मारले. टीएलपी कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यापूर्वी, काल पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात देशातील बिघडत्या परिस्थितीबाबत एक आपत्कालीन बैठक झाली, ज्यामध्ये टीएलपीच्या ताफ्यावर गोळीबार पूर्वनियोजित असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com