Government Employees PF : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पीएफ व्याजदरांबाबत नवीन अपडेट ; अर्थ मंत्रालयाकडून अधिसचूना जारी!

PF Interest Rate Update : सरकारने ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ या तिमाहीसाठी लघु बचत योजनांवरील व्याजदरात बदल केलेला नाही.
PF Fixed Interest Rate
PF Fixed Interest RateSakal
Updated on

Latest PF interest rate update for government employees : जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) ही केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अनिवार्य बचत योजना आहे जी त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते. केवळ सरकारी कर्मचारी जे केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये कायमस्वरूपी सेवेत आहेत  तेच या योजनेत सामील होऊ शकतात. आता केंद्र सरकारने जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि इतर संबंधित फंड्सवरील व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी जीपीएफवरील व्याजदर ७.१टक्के राहील.

हा ७.१ टक्के व्याजदर केवळ जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF) वरच लागू नाही तर अंशदायी भविष्य निर्वाह निधी, ऑल इंडिया सर्व्हिसेस प्रॉव्हिडंट फंड, स्टेट रेल्वे प्रॉव्हिडंट फंड, डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर्स प्रॉव्हिडंट फंड आणि जनरल प्रॉव्हिडंट फंड यासारख्या इतर संबंधित फंडांवरही लागू आहे. GPF प्रमाणेच, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही देखील एक दीर्घकालीन बचत योजना आहे, परंतु ती सामान्य नागरिकांना देखील उपलब्ध आहे. PPF वरील सध्याचा व्याजदर ७.१ टक्के आहे.

कर्मचारी त्यांच्या पगाराचा एक निश्चित भाग दरमहा त्यांच्या जीपीएफ खात्यात जमा करतात. सरकार जीपीएफवर व्याज देखील देते, जे दर तिमाहीत निश्चित केले जाते. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून एक अधिसूचना जारी केली जाते. व्याजदर संतुलित ठेवण्यासाठी, हे दर सामान्यतः सरकारच्या लघु बचत योजनांनुसार ठेवले जातात.

PF Fixed Interest Rate
Namibia beat South Africa: आरारारारा...खतरनाक! नामिबियाने चक्क दक्षिण आफ्रिकेला केलं पराभूत; क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

सरकारने ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ या तिमाहीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजनाआणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रयासारख्या लघु बचत योजनांवरील व्याजदरात बदल केलेला नाही.

PF Fixed Interest Rate
Owaisi on Bihar Election : ओवेसींनी बिहारबाबत घेतला मोठा निर्णय ; तेजस्वी यादव यांना बसणार मोठा दणका?

दरम्यान, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि त्याचा सध्याचा व्याजदर ८.२५ टक्के आहे. तर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली मधील गुंतवणूक बाजाराशी जोडलेली आहे, त्यामुळे परतावा निश्चित नाही, परंतु ते दीर्घकालीन चांगले परतावा देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com