Udaipur Murder Case : उदयपूर हत्याकांडप्रकरणी भारतावर खवळला पाकिस्तान

Udaipur Murder Case News Updates
Udaipur Murder Case News Updatesesakal
Summary

उदयपुरात दोघांनी दुकानात घुसून कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीचा गळा चिरून त्याचा खून केलाय.

Udaipur Murder Case : राजस्थानमधील उदयपूरमध्ये (Rajasthan Udaipur) कन्हैया लालच्या हत्येनंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं (Union Home Ministry) राष्ट्रीय तपास यंत्रणेचं (National Investigation Agency NIA) एक पथक उदयपूरला पाठवलंय. दहशतवादविरोधी कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण एनआयएकडं तपासासाठी सोपवलं जाऊ शकतं, असं सूत्रांनी सांगितलं.

एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, प्रथमदर्शनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं वाटत आहे. हत्या झालेला कन्हैया हा कपडे शिवण्याचं काम करत होता. सोमवारी उदयपूरच्या धनमंडी पोलीस स्टेशन परिसरात दोन जणांनी दुकानात घुसून कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीचा गळा चिरून त्याचा खून केला. या घटनेनंतर कन्हैया याचा गळा चिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. त्यामुळं उदयपूरमधील वातावरण तापलं होतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आदेश येईपर्यंत उदयपूरच्या सात पोलीस ठाण्यांच्या परिसरात तात्काळ संचारबंदी लागू करण्यात आली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलंय.

Udaipur Murder Case News Updates
'महाराष्ट्राची जनता जिंकली'; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अभिनेत्याचं ट्वीट

दरम्यान, हत्येच्या तपासात आतापर्यंत झालेल्या खुलाशांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आलं होतं. ही घटना घडवणाऱ्या दोन आरोपींचे कराचीस्थित सुन्नी इस्लामिक संघटना दावत-ए-इस्लामीशी संबंध आहेत, असंही बोललं जात होतं. आता याप्रकरणी पाकिस्तानकडून अधिकृत वक्तव्यही समोर आलंय. डॉननं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं (Ministry of Foreign Affairs of Pakistan) जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, आम्ही भारतीय माध्यमांमध्ये उदयपूरमधील हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत बातम्या पाहिल्या, त्यात दोन आरोपींना एका ठिकाणाहून अटक करण्यात आल्याचं सांगितलं. शिवाय, त्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचं म्हटलं. या प्रकरणाला पाकिस्तानशी जोडण्याचं आणि बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय.

Udaipur Murder Case News Updates
ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला; शेट्टींचा महाविकास आघाडीवर 'प्रहार'

एवढंच नाही तर हे आरोप आम्ही फेटाळून लावतो, असंही निवेदनात म्हटलंय. मात्र, पाकिस्ताननं आपल्या निवेदनात दावत-ए-इस्लामीचं नाव घेतलेलं नाहीय. याप्रकरणी पाकिस्ताननं भाजप आणि आरएसएसच्या हिंदुत्वावरही निशाणा साधलाय. दरम्यान, उदयपूर हत्याकांडातील दोन्ही आरोपींच्या चौकशीत ते सुन्नी इस्लामच्या सुफी बरेलवी पंथाचं असल्याचं समोर आलंय. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे भारतातील इतर कट्टरपंथी सुन्नी संघटना आणि 'मुस्लिम ब्रदरहूड'शी संबंध आहेत का, याचाही तपास केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com