कलम  370 रद्द करण्याच्या निर्णयावर पाकिस्तानने दिली 'ही' प्रतिक्रिया

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

भारताच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तान बॅकफूटवर गेला आहे. 'या आंतरराष्ट्रीय वादातील एक पक्ष म्हणून चुकीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पाकिस्तान शक्य तेवढ्या सर्व पर्यायांचा विचार करेल. काश्मीर प्रश्नाबाबत असलेली आमची बांधिलकी आम्ही कायम ठेवू,' असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

नवी दिल्ली : भारताच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तान बॅकफूटवर गेला आहे. 'या आंतरराष्ट्रीय वादातील एक पक्ष म्हणून चुकीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पाकिस्तान शक्य तेवढ्या सर्व पर्यायांचा विचार करेल. काश्मीर प्रश्नाबाबत असलेली आमची बांधिलकी आम्ही कायम ठेवू,' असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

भारत सरकारनं जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीर प्रश्नाबाबत असलेली आमची बांधिलकी आम्ही कायम ठेवू असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan reacts Indias decision on Article 370