देशद्रोह खटल्याप्रकरणी मुशर्रफ यांच्या मागण्या फेटाळल्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

फरार मुशर्रफ यांना कोणत्याही अटी घालण्याचा अधिकार नाही. प्रत्यक्ष समर्पण करेपर्यंत त्यांना अशी कोणतीही मागणी करता येणार नसल्याचे पाकिस्तान सरकारने विशेष न्यायालयासमोर स्पष्ट केले

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी देशद्रोह खटल्यास सामोरे जाण्यासाठी ठेवलेल्या अटी पाकिस्ताने आज फेटाळून लावल्या आहेत. फरार व्यक्ती अशाप्रकारे कोणत्याही अटी घालू शकत नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

मुशर्रफ यांनी संबंधित खटल्यास सामोरे जाण्यासाठी लष्करी संरक्षण पुरविणे तसेच, दुबईला जाण्यासाठी मुभा देणे, अशा अटी सरकारसमोर ठेवल्या होत्या. त्यांच्यावर देशद्रोहासारखा गंभीर खटला सुरू असून, फरार मुशर्रफ यांना कोणत्याही अटी घालण्याचा अधिकार नाही. प्रत्यक्ष समर्पण करेपर्यंत त्यांना अशी कोणतीही मागणी करता येणार नसल्याचे पाकिस्तान सरकारने विशेष न्यायालयासमोर स्पष्ट केले.

स्वतःच्या गरजांसाठी मुशर्रफ न्यायालयावर अशी कोणतीही सक्ती किंवा आदेश देऊ शकत नाहीत. असे सरकारने म्हटले आहे. मुशर्रफ यांनी 5 मे रोजी या मागण्यांसंदर्भात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, मुशर्रफ खटल्याचे कामकाज रखडविण्यासाठी असे कृत्य करत असल्याचे सरकारने म्हटले आहे. मुशर्रफ यांना उपचारासाठी देश सोडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत ते परत न आल्याने न्यायालयाने त्यांना फरार घोषीत केले आहे.

. . . . . .

Web Title: Pakistan rejects Musharraf's conditions for his high treason trial