
पाकिस्तानचा एक रिपोर्टर चक्क गाढव गाडीमध्ये बसून रिपोर्टींग करत असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरेनासे होत आहे.
लाहोर : पाकिस्तानचा एक रिपोर्टर चक्क गाढव गाडीमध्ये बसून रिपोर्टींग करत असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरेनासे होत आहे. चांद नवाबच्या व्हिडिओलाही मागे टाकणारा हा व्हिडिओ आहे.
Chand Nawab of Indus News, Karachi, finally gets competition from Amin Hafiz of Geo News, Lahore. pic.twitter.com/5vLkwHde63
— churumuri (@churumuri) June 27, 2020
पाकिस्तानमध्ये महगाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे आवघड झाले आहे. इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रवासासाठी अनेकजण गाढव गाडीचा वापर करताना दिसतात. यामुळे पाकिस्तानमध्ये गाढवाला प्रचंड मागणी आहे. मोठ-मोठ्या शहरांमध्येही गाढव गाडीचा वापर करताना पाहायला मिळत आहे.
पाकची युवती म्हणाली; मोदीजी मला लग्न करायचंय...
पाकिस्तानच्या एका रिपोर्टरने एका गाढव गाडीमध्ये बसून बातमी केल्यामुळे तो चर्चेत आला आहे. पाकिस्तानी महिलेचे म्हणणे आहे की, 'पेट्रोलचे दर कमी करावेत अन्यथा लोक इंधन परवडत नसल्यामुळे पेट्रोलऐवजी वाहनाला गाढव बांधण्यास सुरुवात करतील. रस्त्यावर वाहनांऐवजी फक्त गाढवेच दिसतील.'