पाकमध्ये गेलेल्या नागिरकास केले भारताच्या हवाली

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

लाहोर- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा चुकून ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केलेल्या भारतीय नागरिकास आज (गुरुवार) भारताच्या हवाली केले आहे, अशी माहिती लष्करी अधिकाऱयांनी दिली.

लष्करी अधिकाऱयांनी सांगितले की, श्याम बिहारी राम भूलवश नावाची व्यक्ती चुकून पाकिस्तानच्या हद्दीत आली होती. पुखलियां सेक्टरमधून सैनिकांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. श्यामची चौकशी पुर्ण झाल्यानंतर मानवतावादी दृष्टीकोनातून वाघा सीमेवरील भारतीय लष्करी अधिकाऱयांकडे त्याला आज (गुरुवार) सुपूर्त करण्यात आले आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'पाकिस्तानी सैनिकांनी श्यामला ताब्यात घेतले होते. पाकिस्तानी गुप्तहेर विभागाच्या अधिकाऱयांनी त्याची कसून चौकशी केली होती. चौकशीदरम्यान तो गुप्तहेर नसल्याचे उघड झाले होते. चुकून तो पाकिस्तानच्या हद्दीत आल्याचे समोर आले होते. यामुळे त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे.'

दरम्यान, भारतीय जवान चंदू चव्हाण हे सुद्धा चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. पाकिस्तानने त्यांचीही सुटका केली आहे.

Web Title: pakistan sends back indian man who inadvertently crossed border