'पाकिस्तानने हिंसेचा निषेध करावा'

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

कराची : पाकिस्तानने हिंसेचा पूर्ण निषेध करताना दहशतवाद्यांमध्ये फरक न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी भारताची इच्छा असल्याचे भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त गौतम बंबावाले यांनी आज सांगितले.

कराची : पाकिस्तानने हिंसेचा पूर्ण निषेध करताना दहशतवाद्यांमध्ये फरक न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी भारताची इच्छा असल्याचे भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त गौतम बंबावाले यांनी आज सांगितले.

कराची लिटररी फेस्टिव्हलच्या उद्‌घाटनप्रसंगी बंबावाले यांनी दोन्ही देशांमध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण होण्याची आशा व्यक्त केली. ते म्हणाले, ""पाकिस्तानमध्ये शांतता आणि स्थैर्य नांदून वेगाने विकास व्हावा, अशी भारताची इच्छा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली असताना आत्मपरीक्षण करणेही आवश्‍यक आहे. पाकिस्तानने हिंसेला कोणताही थारा न देता आणि दहशतवाद्यांमध्ये कोणताही फरक न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.''

Web Title: Pakistan should condemn violence