पाकने दहशतवादमुक्तीसाठी प्रयत्न करावेत : भारत 

पीटीआय
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

न्यूयॉर्क : पाकिस्तानच्या नव्या सरकारने एखादा प्रश्‍न वारंवार उकरून काढण्यापेक्षा दक्षिण आशियात शांतता आणि दहशतवादमुक्त कसे करता येईल यासाठी काम करावे, अशा कानपिचक्‍या आज भारताने दिल्या. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी "काश्‍मीर'चा थेटपणे उल्लेख न करता संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानकडून सतत "काश्‍मीर' राग आळवला जात असल्याने खडे बोल सुनावले. 

सय्यद अकबरुद्दीन म्हणाले, की कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शांततेच्या मार्गाने धोरण आणि भूमिका असणे गरजेचे आहे, हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे. संयुक्त राष्ट्रसंघात एखादा मुद्दा सतत मांडून मतांचे राजकारण करण्यापेक्षा एक सुरक्षित, स्थिर आणि विकसित दक्षिण आशिया करण्यासाठी, तसेच दहशतवाद व तणावमुक्तीसाठी रचनात्मक काम करण्याची अपेक्षा भारताने व्यक्त केली. भारताने मांडलेली भूमिका ही पाकिस्तानच्या नव्या सरकारसाठी महत्त्वाची असणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सीमेवरील स्थितीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. अशा स्थितीत सय्यद अकबरुद्दीन यांनी एकदा अपयशी ठरलेला प्रयत्न पुन्हा पुन्हा केल्याने शांतता सौहार्दपूर्ण वातावरण प्रस्थापित करू शकत नाही, असे नमूद केले. पाकिस्तान सरकारने कोणत्याही वादाच्या फंदात न पडता सुरक्षित, स्थिर आणि विकसित दक्षिण आशियासाठी सकारात्मक रूपाने प्रयत्न करावेत, असा सल्लाही भारताने दिला.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan should try to counter terrorism says India