पाकिस्तानकडून हाफिज सईदची आर्थिक कोंडी

पाकिस्तानकडून हाफिज सईदची आर्थिक कोंडी

इस्लामाबाद : लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याची आता पाकिस्तानकडून आर्थिक कोंडी केली. त्याच्यावर पाकिस्तानच्या 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स'कडून ही कारवाई करण्यात आली. 

याबाबत पाकिस्तानच्या 'काऊंटर टेररिझम डिपार्टमेंट'चे (सीटीडी) प्रवक्त्यांनी सांगितले, की हाफिज सईद सर्वांविरोधात लाहोर, गुजराणवाला आणि मुलतानमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. दहशतवादासाठी मालमत्तेच्या माध्यमातून फंडिंग पुरविले जात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. 1 आणि 2 जुलैला पंजाब सीटीडीने जमात-उद-दावाह, लष्कर-ए-तैयब आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन 23 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच दवात-उल-इर्शाद ट्रस्ट, मुअजा-बिन-जबल ट्रस्ट, अल्-अंफाल ट्रस्ट यांसारख्या संघटनेवर कारवाई करण्यात आली. 

दरम्यान, पाकिस्तानच्या काऊंटर टेररिझम डिपार्टमेंटच्या या कारवाईनंतर दहशतवादी संघटनेचे धाबे चांगलेच दणाणले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com