पाकिस्तान: बाळाचं कापलेलं शीर गर्भाशयातच टाकून शरीर बाहेर काढलं

डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्णालय कर्मचाऱ्यांनी हा कारभार केला आहे.
Newborn
Newbornesakal

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची एक भयंकर घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी नवजात शिशूचं कापलेलं शिर महिलेच्या गर्भाशयातच ठेवलं आहे. त्यामुळे या ३२ वर्षीय हिंदू महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. (Pakistan Staff cut off new born baby's head and pull out the rest of the body)

Newborn
भारत पाकिस्तान दरम्यानची सिंधूनदी पाणीप्रश्नावरील चर्चा अंतिम टप्प्यात

पाकिस्तानात ही भयावह घटना घडली आहे. पाकिस्तानातल्या सिंध इथल्या ग्रामीण आरोग्य केंद्रात एक गर्भवती महिला गेली होती. मात्र या केंद्रात कोणीही महिला स्त्रीरोग तज्ज्ञ नव्हती. त्यामुळे अननुभवी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिच्यावर उपचार केले. त्यानंतर तिच्यासोबत ही भयंकर घटना घडली आहे.

Newborn
'या' गावात बायको प्रेग्नंट होताच नवरा करतो दुसरं लग्न, कारण ऐकूण थक्क व्हाल

नक्की घडलं काय?

या गर्भवती महिलेला प्रचंड त्रास होऊ लागला. त्यानंतर तिला जवळच्याच मिठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे तिच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स उपलब्ध नव्हते. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला ग्रामीण आरोग्य केंद्रात आणलं. आता तिच्या जीवाला धोका होता. त्यामुळे या केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांनी या बाळाला बाहेर काढण्याचं ठरवलं. या बाळाला बाहेर काढत असताना त्याचं शरीर तर बाहेर आलं, पण शीर मात्र गर्भाशयातच अडकलं. त्यामुळे महिलेचा जीव वाचवण्यासाठी शीर कापावं लागलं. मात्र हे शीर गर्भाशयातच राहिलं.

Newborn
भारत करतोय अण्वस्त्रांचा विस्तार; पाकिस्तान नाही मागे

या धक्कादायक आणि गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत सिंध आरोग्य सेवेचे संचालक डॉ. जुमन बहोतो यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना घडत असताना काही कर्मचाऱ्यांनी या सगळ्याचे व्हिडीओज आणि फोटो काढत ते सोशल मीडियावर शेअरही केले होते. त्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com