esakal | भारतीय नौदलाला अमेरिकेकडून मिळाली MH-60R 'रोमियो' हेलिकॉप्टर
sakal

बोलून बातमी शोधा

MH-60R

भारतीय नौदलाला अमेरिकेकडून मिळाली MH-60R 'रोमियो' हेलिकॉप्टर

sakal_logo
By
दीनानाथ परब

टेक्सास: सॅन दिएगो (San Diego) येथील नौदल तळावर शुक्रवारी अमेरिकन नौदलाने दोन MH-60R हेलिकॉप्टर भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली. MH-60R 'रोमियो' हेलिकॉप्टर नौदलाकडे (navy) सुपूर्द करुन भारत-अमेरिकेमध्ये संरक्षण क्षेत्रात (india-america defence sector) एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकन नौदलाची भारतीय नौदलाला मदत होणार आहे. (Indian Navy receives first two 24 MH-60R helicopters from US)

लॉकहीड मार्टिनने बनवलेली २४ बहुउद्देशीय MH-60R 'रोमियो' हेलिकॉप्टर भारतीय नौदलासाठी खरेदी करण्याचा करार झाला आहे. एकूण २.४ अब्ज डॉलर्सचा हा व्यवहार आहे. भारताकडे ही हेलिकॉप्टर हस्तांतरीत करण्याचा सॅन दिएगो येथील नौदल तळावर छोटेखानी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंह संधू उपस्थित होते.

हेही वाचा: राज ठाकरे नाशिकमध्ये, अमित ठाकरेंकडे येऊ शकते मोठी जबाबदारी

रोमियो हेलिकॉप्टर्स कशी हाताळायची, त्यासाठी भारतीय नौदलाचे वैमानिक आणि क्रू मेंबर्सचे अमेरिकेत प्रशिक्षण सुरु आहे. परदेशी लष्करी विक्री मार्गाने ही हेलिकॉप्टर्स भारताला मिळणार असून २.४ अब्ज डॉलर्सचा हा करार आहे. या हेलिकॉप्टर्समुळे हिंदी महासागरात भारतीय नौदलाची ताकत कैकपटीने वाढणार आहे.

हेही वाचा: कोब्रा सापाबरोबर खेळ, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करणं सर्पमित्राला पडलं महाग

काय आहे 'MH-60 रोमियो'चं वैशिष्टय

भारतीय नौदलातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'MH-60 रोमियो' ही चौथ्या पिढीची हेलिकॉप्टर्स आहेत. टॉरपीडोस आणि मिसाइल्सनी ही हेलिकॉप्टर्स सुसज्ज आहेत. समुद्राखाली असणाऱ्या पाणबुडीला शोधून त्यावर मिसाईल हल्ला करण्यासाठी 'MH-60 रोमियो' हेलिकॉप्टर्स सक्षम आहेत.

करारावर स्वाक्षरी झालीय, तेव्हापासून पुढच्या पाचवर्षात भारतीय नौदलाला ही हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत. 'MH-60 रोमियो' ब्रिटीश सी किंग हेलिकॉप्टर्सची जागा घेतील. संरक्षण खरेदी परिषदेने २०१८ मध्ये या खरेदीला मंजुरी दिली होती.

भारतीय नौदलाला काय मिळणार?

करारानुसार, नौदलाला खरेदी पॅकेजतंर्गत हेलिकॉप्टरला लागणार सुट्टे भाग, हवेतून जमिनीवर मारा करणारी शस्त्र आणि वैमानिकासह क्रू मेंबर्सला प्रशिक्षण देण्यात येईल. जे प्रशिक्षण आधीपासूनच अमेरिकेत सुरु आहे.

कोरोना व्हायरसमुळे २०२० मध्ये लॉकडाउन होतं. त्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रम लांबणीवर गेला होता. अनलॉक सुरु झाल्यानंतर नौदलाचे पथक प्रशिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले.

loading image