
नवी दिल्लीः तालिबानने पाकिस्तानला चांगलंच जेरीस आणलं आहे. भारतासमोर कायम तोरा दाखवणारा पाकिस्तान आता अफगाणिस्तानसमोर नरमलेला दिसतोय. तालिबानकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्यांनंतर शहबाज शरीफ यांनी आता चर्चेची इच्छा व्यक्त केलीय. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आता पाकिस्तानवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी भारतालाच जबाबदार धरले आहे.