esakal | बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या तालिबानीसमोर महिलेनं रोखली 'नजर'
sakal

बोलून बातमी शोधा

Afghanistan

काबूलमध्ये अनेक रॅलींमध्ये जमलेल्या शेकडो लोकांना पांगवण्यासाठी तालिबाननं काल काबूलच्या रस्त्यावर गोळीबार केला.

बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या तालिबानीसमोर महिलेनं रोखली 'नजर'

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

काबूल : अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी असलेल्या काबूलमध्ये (Kabul) काल (मंगळवार) पाकिस्तान दुतावासाबाहेर शेकडो महिलांनी कट्टरपंथी तालिबानविरोधात निदर्शने केली. या दरम्यान काढण्यात आलेला फोटो, व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका चित्रात एक अफगाण महिला सशस्त्र तालिबानी जवानाचा (Taliban Soldier) सामना करताना दिसतेय. एका तालिबान सैनिकानं त्या महिलेवर आपली बंदूक रोखून धरलीय, तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, पण ती महिला निर्भयपणे त्याच्यासमोर ताठमानेनं उभीच आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.

काबूलमध्ये अनेक रॅलींमध्ये जमलेल्या शेकडो लोकांना पांगवण्यासाठी तालिबाननं काल काबूलच्या रस्त्यावर गोळीबार केला. यात काहीजण जखमी झाले आहेत. मात्र, या घटनेनं 1989 मध्ये चीनमध्ये घडलेल्या तियानमेन स्क्वायर घटनेची आठवण करून दिलीय. तालिबान विरोधातील अभूतपूर्व निदर्शनांमध्ये तीन रॅलींचा सहभाग होता. यात बहुतांश महिलांनीच भाग घेतला होता.

हेही वाचा: चीन तालिबानला पैसा पुरवेल, याची भीती वाटते का? बायडेन म्हणाले....

टोलो न्यूजच्या पत्रकार ज़हरा रहिमीने रॉयटर्सचा फोटो एका ट्विटमध्ये शेअर केलाय. ज्यात तालिबानी सैनिक एका अफगाण महिलेवर बंदुका रोखून धरलेला आहे. या फोटोत 1989 मध्ये चीनमधील तियानमेन स्क्वायरमध्ये एकाकी माणसानं टाक्या अडवल्याची झलक दिसतेय. तेव्हा त्याच्या धैर्याचं अख्या जगानं कौतुक केलं होतं. ज़हरा पुढे लिहितात, एक अफगाण महिलेच्या छातीवर तालिबान सैनिक बंदूक रोखून धरतोय. मात्र, ती महिला त्याला न जुमानता त्याच्यासमोर निधड्या छातीनं त्याचा समान करतेय. तीच्या या धैर्याला सलाम, असं त्यांनी म्हंटलंय.

हेही वाचा: अफगाणिस्तानचा पंतप्रधानच दहशतवादी, मोहंमद अखुंदबद्दलच्या पाच गोष्टी

काबुलवर ताबा मिळवल्यानंतर, अफगाणिस्तानात तालिबानची दमनकारी राजवटीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जेव्हा गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानात अनेक आंदोलनं झाली असली, तरी स्टेडियममध्ये अनेकांचा बळी गेलाय. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर फिरत आहेत. बॅनर धरून आणि घोषणाबाजी करत तालिबानचा विरोध करत आहेत. दरम्यान, तालिबाननं काबूलमधील निदर्शनांचं कव्हरेज करणाऱ्या अनेक पत्रकारांसोबत गैरवर्तन देखील केलं असून अनेकांना वार्तांकन करण्यापासूनही रोखलं गेलंय.

loading image
go to top