पाकिस्तानला झटका; काळ्या यादीत सामील होण्याची टांगती तलवार

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 October 2020

एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना आज धक्का बसला.

सिडनी- एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना आज धक्का बसला. दहशतवादी संघटनांना अर्थसाह्य आणि गैरव्यवहारावर अंकुश ठेवण्यास पाकिस्तानला अपयश आल्याने एफएफटीएफची संस्था आशिया पॅसिफिक ग्रुपने पाकिस्तानला ‘एनहान्स्ड फॉलो अप’च्या यादीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला ग्रे यादीतून बाहेर पडणे दूरच परंतु काळ्या यादीत सामील होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार दहशतवादी संघटनांना पैसे पुरवणे आणि आर्थिक गैरव्यवहार थांबवण्यासाठी एफएटीएफच्या सूचनांना लागू करण्यास पाकिस्तानने फारशी उत्सुकता दाखवली नाही आणि त्यातील प्रगती खूपच कमी आहे. या आधारावर आशिया पॅसेफिक समूहाने पाकिस्तानला एनहांन्स्ड फॉलोअपमध्ये ठेवले आहे.

भारतीय लष्कर घालतंय दहशतवाद्यांना कंठस्नान; 2020मध्ये 75 ऑपरेशन्स केली यशस्वी

अमेरिकेचे वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा या यादीत समावेश झाल्याने वित्तीय संस्थाना त्यांच्यासोबत व्यापार करणे कठीण जाणार आहे. एफएफटीएफने पाकिस्तानला 27 मुद्द्यांवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय यासाठी निर्धारित वेळ दिला आहे. जर पाकिस्तान या 27 मुद्यांना पूर्ण करण्यात अपयशी ठरला तर, त्याचा समावेश काळ्या यादीमध्ये केला जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पाकिस्तानसाठी तो मोठा झटका असणार आहे. 

अमेरिकेच्या स्टेट डिमार्टमेंटच्या ''कंट्री रिपोर्टस ऑन टेररिझम''मध्ये पाकिस्तानवर टीका करण्यात आली आहे. भारताला निशाणा बनवणाऱ्या लश्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद अशा संघटना पाकिस्तानमध्ये कार्यरत आहेत, असा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. पाकिस्तानने जैश ए मोहम्मदचा संस्थापक आणि संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषीत केलेला दहशतवादी मसूद अजहर आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यातील प्रोजेक्ट मॅनेजर साजिद मिर यासारख्या दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानमध्ये मुक्तपणे फिरत आहेत, असंही रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan terrorist funding imran khan fatf asian group