esakal | भारतीय लष्कर घालतंय दहशतवाद्यांना कंठस्नान; 2020मध्ये 75 ऑपरेशन्स केली यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

IndiaKashmir

जम्मू आणि काश्मीरमध्ये सीआरपीएफ आणि पोलिसांच्या कारवाईला यश मिळताना दिसत आहे.

भारतीय लष्कर घालतंय दहशतवाद्यांना कंठस्नान; 2020मध्ये 75 ऑपरेशन्स केली यशस्वी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमध्ये सीआरपीएफ आणि पोलिसांच्या कारवाईला यश मिळताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसात विविध 4 ऑपरेशन्समध्ये 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शिवाय एका दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. आजच्या ऑपरेशनमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर शैफुल्ला मारला गेला. शैफुल्लाचा 3 मोठ्या दहशतवादी हल्ल्यात हात होता, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी डी सिंग यांनी दिली आहे. 

कोरोनाची लशीचा एकच डोस पुसेसा नाही; भारतीयांबाबत आरोग्य मंत्रालयाचा खुलासा

यावर्षी 75 यशस्वी ऑपरेशन्स करण्यात आले असून या कारवाईत तब्बल 180 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले आहे. याशिवाय 138 दहशतवादी आणि त्यांच्या सहकार्यांना अटक करण्यात आली आहे. यावर्षीच्या ऑपरेशन्सच्या उपलब्धीने विक्रम प्रस्थापित केला असल्याचं दिलबाग सिंग म्हणाले आहेत.

पाकिस्तानचा रहिवाशी असलेला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर शैफुल्ला दनयाली याचा चकमकीत मृत्यू झाला. शैफुल्ला याने भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. तसेच त्याने आपला तळ उत्तर काश्मीरातून दक्षिण काश्मीरात हलवला होता. त्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठे हल्ले घडवून आणले आहेत. 24 सप्टेंबर रोजी चंदोरा येथे सीआरपीएफ जवान शहीद झाला होता. यासाठी शैफुल्ला कारणीभूत होता. याशिवाय 2 ऑक्टोंबर रोजीच्या हल्ल्याचाही तो सूत्रधार होता. यात दोन सीआरपीएफ जवान शहीद झाले होते.