भारताची चिंता वाढली? 'दहशतवादी' पाकिस्तान आता संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष; 193 पैकी 182 देशांचा पाठिंबा
Pakistan UNSC President : सुरक्षा परिषदेमध्ये (United Nations Security Council) पाच स्थायी सदस्य (चीन, अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन) आणि दहा तात्पुरते सदस्य असतात. पाकिस्तान सध्या तात्पुरता सदस्य आहे आणि त्याचा कार्यकाळ डिसेंबर 2026 पर्यंत राहणार आहे.
इस्लामाबाद/न्यूयॉर्क : पाकिस्तानने 1 जुलै 2025 पासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अध्यक्षपदाची सूत्रे एका महिन्यांसाठी स्वीकारली आहेत. 2013 नंतर प्रथमच ही जबाबदारी पाकिस्तानकडे आली असून, हा त्यांचा UNSC मधील आठवा कार्यकाळ आहे.