दहशतवाद्यांना उत्तेजन देण्याचे "आयएसआय'चे धोरण

वृत्तसंस्था
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

""पाकिस्तानमधील सरकार हे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना आम्ही पाहिले आहे. मात्र आयएसआय त्यांचे एक वेगळेच धोरण राबवित आहे,'' असे मॅटिस म्हणाले. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला "अजून एक संधी' देण्याची आवश्‍यकता असल्याचे मतही यावेळी व्यक्‍त केले.

नवी दिल्ली - पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या "आयएसआय'चे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे, स्पष्ट मत अमेरिकेचे लष्करप्रमुख जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांनीही या मतास पुष्टी देत आयएसआयचे स्वत:चेच एक धोरण असल्याची टीका केली. अमेरिकेच्या अफगाणिस्तानसंदर्भातील धोरणाची माहिती देताना हे दोन्ही उच्चस्तरीय अधिकारी "सिनेट'ला संबोधित करत होते.

""पाकिस्तानमधील सरकार हे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना आम्ही पाहिले आहे. मात्र आयएसआय त्यांचे एक वेगळेच धोरण राबवित आहे,'' असे मॅटिस म्हणाले. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला "अजून एक संधी' देण्याची आवश्‍यकता असल्याचे मतही यावेळी व्यक्‍त केले.

दहशतवादास आश्रय न देण्यासंदर्भात पाकिस्तानवर सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरुन मोठा दबाव येत असल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या संरक्षण मंत्री व लष्करप्रमुखांनी व्यक्‍त केलेली ही भूमिका सूचक मानली जात आहे.

Web Title: pakistan usa terrorism isi