पाकिस्तानात महिलांना विद्यापीठांमध्ये मोबाईल वापरावर बंदी; वाचा निर्बंध

पाकिस्तानातील सर्व महिला विद्यापीठांमध्ये मुलींच्या स्मार्टफोन वापरासह अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.
Pakistan
PakistanSakal

इस्लामाबाद : पाकिस्तानातील सर्व महिला विद्यापीठांमध्ये मुलींच्या स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानातील वायव्य भागातील विद्यापीठांनी हा निर्णय घेतल्याचं एका Tv रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा भागात स्वाबी महिला विद्यापीठ असून तेथे तालिबानी अतिरेकी सक्रिय आहेत, ते महिलांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात असं सांगण्यात आलं आहे.

समा वाहिनीच्या वृत्तानुसार खैबर पख्तुनख्वा येथील स्वाबी विद्यापीठाने एक सूचना जारी करत सांगितलं की, महिलांना २० एप्रिलपासून विद्यापीठाच्या परिसरात स्मार्टफोन, टॅबलेट किंवा स्क्रीन टच फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारपासून या विद्यापीठात मुलींना स्मार्टफोन वापरता येणार नाही. विद्यापीठातील अभ्यासाच्या वेळेत मुली सोशल मीडियाचा वापर करतात, त्यामुळे त्याच्या अभ्यासावर, वागण्यावर आणि प्रगतीवर परिणाम होतो म्हणून विद्यार्थी विद्यापीठात फोन वापरु शकत नाहीत असं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

Pakistan
आंतरखंडीय क्षेपणास्त्राची रशियाकडून चाचणी; पुतीन म्हणाले...

विद्यापीठात हिंसाचार घडला तर विद्यापीठ विद्यार्थांच्या विरोधात कडक कारवाई करणार असून ५००० रुपयांचा दंड लावण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. खैबर पख्तुनख्वा मधील विद्यापीठांनी विद्यार्थीनींवर ड्रेस कोड आणि केसांच्या रचनेवरुन अनेक निर्बंध लादले आहेत त्यामध्ये ते महिलांना फक्त सलवार कमीज घालून जाण्यासाठी परवानगी देत असल्याची माहिती आहे. दरम्यान पेशावर विद्यापीठाने गेल्या वर्षी मार्चमध्ये विद्यार्थ्यांना नवीन ड्रेस कोडचे पालन करण्याचे निर्देश दिले होते.

महिलांनी त्यांच्या आवडीच्या कमीजसह पांढरी सलवार घालावी आणि पुरुषांनी सभ्य कपडे घालावेत, असे निर्देश दिले होते. ड्रेस कोडमुळे विद्यार्थी कॅम्पसमध्ये येताना सारखे दिसणारे कपडे घालतील असं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Pakistan
राज्यातील ७२ टक्के मुस्लीमांनी भोंग्याचे आवाज कमी केले : नाना पटोले

9 जानेवारी, 2021 रोजी खैबर पख्तुनख्वाच्या मानसेरा जिल्ह्यातील हजारा विद्यापीठाने महिलांना ओढणी, चादर किंवा सलवार कमीज घालण्यास सांगितले होते, तसेच नवीन नियमांनुसार जड मेकअप, दागिने आणि महागड्या हँडबॅगवर बंदी घालण्यात आली होती. त्याबरोबर पुरुषांना पूर्व किंवा पाश्चात्य पोशाख घालण्यास सांगितले होते. विद्यार्थी कापलेले, फाटलेले किंवा फिट केलेले जीन्स, शॉर्ट्स, चप्पल किंवा कानातले आणि चेन यांसारखे सौंदर्यप्रसाधने परिधान करु शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं. तसेच विद्यापीठाने विद्यार्थांच्या केस आणि दाढीची शैली अनिवार्य केली आहे. असं समा टीव्हीच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com