पाकिस्तान: सौदी अरेबियाने जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत जवळपास ५,०३३ पाकिस्तानी भिकाऱ्यांना मायदेशी परत पाठवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी संसदेत ही माहिती दिली. याशिवाय, इतर देशांनीही पाकिस्तानी भिकाऱ्यांना परत पाठवल्याचे त्यांनी सांगितले. या आकडेवारीमुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे.